IDA Yavatmal

IDA Yavatmal IDA Yavatmal is Yavatmal branch of Indian Dental Association

जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे हा साजरा केला जातो त्यानिमित्ताने यवतमाळ इंडियन डेंटल असोसिएशनने अनेक उपक्रमांचे ...
01/06/2025

जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे हा साजरा केला जातो त्यानिमित्ताने यवतमाळ इंडियन डेंटल असोसिएशनने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यात नगरपरिषद यवतमाळ, ट्राफिक विभाग, दि यवतमाळ अर्बन बँक, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, गो ग्रीन फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ, माहेश्वरी युवा मंच, महावीर युवा मंच, इनरव्हील क्लब यवतमाळ, अशा अनेक संघटनांनी यात सहकार्य केले. या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने तंबाखू विरोधी जनजागृती व्याख्यान, मुख आरोग्य तपासणी व सल्ला, तंबाखू विरोधी वाहन रॅली व आकाशवाणीवर व्यापक जनजागृतीसाठी मुलाखत याचा समावेश होता.

05/04/2025

श्रीराम नवमीच्या पावन पर्वाच्या सर्व यवतमाळकर जनतेला आरोग्यमय शुभेच्छा

14/02/2023
Indian Dental Association, Yavatmal Celebrates World Diabetes Day  with Awareness Talk on Diabetes & Dental Issues/मधुमे...
14/11/2022

Indian Dental Association, Yavatmal Celebrates World Diabetes Day with Awareness Talk on Diabetes & Dental Issues/मधुमेह आणि दातांचे आजार on Facebook Live
Speakers, Dr. Vaibhav Chakkarwar, Diabetologist & Dr. Dnyaneshwar Punse, President, IDA on Tuesday, 15th November, 10 am.
Please be available to know more on the topic

१ ऑगस्ट हा दिवस भारतात मौखिक स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखा आणि आकाशवाणी यवतमाळ...
01/08/2022

१ ऑगस्ट हा दिवस भारतात मौखिक स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखा आणि आकाशवाणी यवतमाळ 102.7 यांनी संयुक्तपणे मौखिक स्वच्छतेवर जनजागृती चर्चा आयोजित केली आहे.
डॉ. गणेश पवार (सदस्य, IDA यवतमाळ)
डॉ. सुमित शेंडे (सचिव, IDA यवतमाळ) यांच्यासोबत ची मुलखात प्रक्षेपण
आकाशवाणी यवतमाळ 102.7
दिनांक 1 ऑगस्ट
वेळ , सकाळी 11 वाजता आहे.

,मौखिक स्वच्छतेविषयी जनजागृतीपर चर्चा सर्वांनी ऐकावी .

१ ऑगस्ट हा दिवस भारतात मौखिक स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखा आणि आकाशवाणी यवतमाळ...
31/07/2022

१ ऑगस्ट हा दिवस भारतात मौखिक स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखा आणि आकाशवाणी यवतमाळ 102.7 यांनी संयुक्तपणे आमचे डॉक्टर डॉ. गणेश पवार (सदस्य, IDA यवतमाळ) आणि डॉ. सुमित शेंडे (सचिव, IDA यवतमाळ) यांच्यासोबत मौखिक स्वच्छतेवर जनजागृती चर्चा आयोजित केली आहे. कृपया, आकाशवाणी यवतमाळ 102.7 वर १ ऑगस्ट,सोमवार, सकाळी 11 वाजता ,मौखिक स्वच्छतेविषयी जनजागृतीपर चर्चा ऐका.

03/06/2022

जागतिक तंबाखू निषेध दिवस व जागतिक पर्यावरण दिवस निमित्त जनजागृती रॅली...
Say no to to***co

31 मे , जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन. यानिमित्त तंबाखूव्यसन यामुळे होणारे शरीरावर परिणाम, मुख कर्क रोग होण्याआधीचे तोंड...
30/05/2022

31 मे , जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन.
यानिमित्त तंबाखूव्यसन यामुळे होणारे शरीरावर परिणाम, मुख कर्क रोग होण्याआधीचे तोंडातील लक्षने, प्रथमिकउपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सविस्तर माहीती, प्रसारण
आकाशवाणी यवतमाळ
31मे 2022
सकाळी 10.30 वाजता.

डॉ दिलीप चव्हाण
डॉ अमृता शेंडगे
IDA yavatmal br
Amruta Jankar-Shendge
Dr-Dilip Chavhan

इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखे द्वारा भगवान महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अनु...
15/04/2022

इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखे द्वारा भगवान महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त अनुक्रमे आराधना भवन राजेंद्रनगर व नागभूमी वडगाव या ठिकाणी मुख व दंत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे आराधना भवन येथे डॉक्टर आनंद भंडारी डॉक्टर रुपेश कोटेच्या डॉक्टर करुणा कोटेच्या डॉक्टर हर्षित कोठारी डॉक्टर स्नेहीका कोठारी व डॉक्टर हर्शिका लुणावत यांनी तर नागभूमी वडगाव येथे डॉक्टर राखी शेंडे डॉक्टर प्राची शेंडे जनबादे डॉक्टर वैभव राऊत डॉक्टर आकाश कुडमेथे यांनी जवाबदारी सांभाळली. दोन्ही कार्यक्रमांना जनतेने भरघोस प्रतिसाद दिला. डॉक्टर आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नागभूमी वडगाव यांनी त्यांच्या हॉलमध्ये कार्यक्रमाची व्यवस्था करून दिली डॉक्टर ज्ञानेश्वर पुनसे डॉक्टर सुमित शेंडे सुमित शेंडे व डॉक्टर मितेश छतानी, डॉ वैभव आगरकर व डॉक्टर अमित अग्रवाल यांनी आयडीए तर्फे कार्यक्रमाला मदत केली. डॉक्टर प्रशांत तामगाडगे डॉक्टर रश्मी तामगाडगे डॉक्टर शैलेश गाढवे डॉक्टर महेश सारोळकर डॉक्टर श्वेता भट्टी डॉक्टर दिलीप चव्हाण हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. सामाजिक उत्सवांमध्ये मुख आरोग्याबद्दल जागृती हे सूत्र पकडून आयोजित विविध कार्यक्रमांच्या योजनेतून हे कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

*रामनवमीनिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन*इंडीयन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखेत द्वारा महिनाभर चालण...
12/04/2022

*रामनवमीनिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन*
इंडीयन डेंटल असोसिएशन यवतमाळ शाखेत द्वारा महिनाभर चालणाऱ्या निरनिराळ्या सामाजिक उत्सवांमध्ये व्यसनां विषयी व तोंडातील विविध आजारांविषयी जनजागृती व त्यावरील उपाय यांचे मार्गदर्शन या दृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक भाग म्हणून रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत यवतमाळ डेंटल असोसिएशन द्वारे सहभाग घेतला. या झाकीने मार्गक्रमण करत असताना जाजू चौक येथे डॉ महेश सरोळकर व डॉ पुनसे यांनी जनतेसोबत मौखिक आरोग्यासाठी संवाद देखील साधला. झाकी मध्ये रावण रूपांनी तोंडातील विविध आजार व विविध व्यसने यांचे मॉडेल तयार केले होते तर उपाय व काळजी हे रामराया प्रमाणे रक्षण करणारे दाखवले होते दाताची भव्य प्रतिकृती देखील या जाकी मध्ये दर्शविली होती. जनतेने देखील या अनोख्या कल्पनेचे स्वागत केले या झाकीसाठी डॉक्टर ज्ञानेश्वर पुनसे डॉक्टर सुमित शेंडे डॉक्टर दिलीप चव्हाण डॉक्टर अमर काबरा डॉक्टर मितेश छतानी डॉ आनंद भंडारी डॉक्टर संतोष छतानी डॉक्टर निखिल मानकर , डॉ वैभव राउत, यांनी विशेष मेहनत घेतली डॉक्टर स्नेहल राशतवार यांनी दाताचे मॉडेल तयार करण्यात मार्गदर्शन व मदत केली. डॉक्टर सुरेंद्र पद्मावार सर यांच्या हस्ते नारळ फोडून रॅलीची सुरुवात करण्यात आली. प्रकल्प संयोजक म्हणुन डॉ महेश सारोळकर यांनी काम पाहिले. व हा उपक्रम घडवून आनला. महिनाभर चालणाऱ्या निरनिराळ्या जनजागृती कार्यक्रमांमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मौखिक आरोग्याचे महत्त्व जाणून घ्यावे ,असे आवाहन ida yavatmal चे सचिव डॉ सुमित शेंडे तर्फे करण्यात आले आहे.

COMMUNITY MASS AWARENESS programme by IDA yavatmal branch.We r doing awareness about oral health, diseases , oral cancer...
11/04/2022

COMMUNITY MASS AWARENESS programme by IDA yavatmal branch.
We r doing awareness about oral health, diseases , oral cancers, & habits . Also focusing on prevention aspect of this. Awareness programmes will b conducted on the auspicious ocasions of all festival ..
Like
रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, आणि रमजान ईद.
सर्व धर्म समभाव , या संकल्पनेतून हा उपक्रम IDA yavatmal महिनाभर राबवत आहे.
सर्व यवतमाळ करांनी याचा लाभ घ्यावा .
धन्यवाद.
TEAM IDA

Address

Mauli Hospital, Near Ranapratap Gate, Arni Road
Yavatmal
445001

Telephone

+917972306716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when IDA Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to IDA Yavatmal:

Share