12/04/2026
Deori Dist Gondia
*दिनांक : ०७/०४/२०२६*
– *जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्घाटन सोहळा*
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक *०७ एप्रिल २०२६* रोजी देवरी येथे डॉ. नंदुरकर दातांच्या दवाखान्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धूमनखेडे साहेब उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. रोहित नंदुरकर व डॉ. दीक्षा नंदुरकर यांच्या दातांच्या दवाखान्याचे विधिवत उद्घाटन करण्यात आले व देवरीकरांच्या सेवेसाठी दवाखाना समर्पित करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन स्वतः डॉ. रोहित नंदुरकर यांनी केले. देवरी परिसरातील मागास भागाचा विचार करून रुग्णांना उपचारांसोबत आवश्यक असणाऱ्या विविध वित्तीय सुविधा देखील दवाखान्यामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती यावेळी मान्यवरांना देण्यात आली.
*डॉ. धूमनखेडे* *साहेबांचा* सत्कार *श्रीमती आकरे ताईसाहेब* यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच *श्री. राधेश्यामजी बगाडिया* यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास सुमारे ४०० नागरिकांची उपस्थिती लाभली व कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ✨
🙏👍