Dr. Gavhane Dental and Ayurvedic Panchkarma Centre

Dr. Gavhane Dental and Ayurvedic Panchkarma Centre Dentistry with the difference . Ayurveda for your well being.

03/01/2022
31/10/2021
28/08/2021

आपल्या हाॅस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त अत्यल्प दरात आयोजित या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. हि विनंती.

26/08/2021

Glimpses of Clinic Anniversary Celebration 😊.....

28/07/2021

Diabetes cured completely of one more patient of ours.Read the experience natrated by her son.
गुरुपौर्णिमेची भेट
माझी आई श्रीमती पुष्पावती सुधाकर उदावंत वय ६७ वर्षे ,राहुरी व राहुरीतील डॅाआश्लेषा गव्हाने मॅडम यांच्या एकत्रित अथक प्रयत्नानंतर सुमारे ३४ वर्षापासुनच्या मधुमेहावर मात करण्यात यश मिळाले आहे .आम्ही सर्व भांवडे लहान असतानाच जानेवारी १९८७ मध्ये आमचे वडील,आमच्या एकत्रित परिवाराचे सर्वेसर्वा व एक कष्टाळू व प्रामाणिक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून केवळ गावातच नव्हे तर समाजातही सुपरिचित असणारे आमचे वडील कै सुधाकर गजानन उदावंत यांचे वयाच्या केवळ ४५ व्या वर्षी ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराने आकस्मिक दु:खद निधन झाले व आमच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला व संपूर्ण समाज हळहळला.आणि नेमकी हिच घटना माझी आई श्रीमती पुष्पावती हिला डायबिटीस(मधुमेह) सुरू व्हायला कारणीभूत ठरली.१९-२०वर्षे निरंतर मधुमेहाची औषधे घेतल्यानंतर २००६ साली ह्दयविकाराचा आजार जडला लहान भाऊ प्रफुल्लच्या लग्नांनंतर १५ दिवसांनी लगेचच पुण्यात रुबी हॅाल हॅास्पिटलला डॅा शिरीष हिरेमठ यांच्या हातून आईची पहिली एन्जिओप्लास्टी झाली नंतर २०१० मध्ये परत ह्दयविकाराने डोके वर काढले व अनगरला आनंदऋषिजी हॅास्पिटलमध्ये बायपास सर्जरी केली गेली .त्यानंतर अनगरला माधवबागबद्दल माहिती मिळाली तिथे सुमारे दीड महिना ह्दयरोगावर उपचार घेतले पण एव्हाना खुप उशीर झाला होता.शरीरातील स्थुलपणा ,काळजी इ. गोष्टींमुळे पुन्हा डॅा कांडेकर सर ,नोबल हॅास्पिटल अनगर यांनी २०१३ आईची तिसर्यांदा एन्जिओप्लास्टी केली .मात्र त्याआधी केलेल्या माधवबागच्या ह्दयचिकित्सा उपचारामुळे ह्दयाच्या अनेक बारीक बारीक मृत झालेल्या रक्तवाहिन्यादेखील सुरळीत झाल्या होत्या .मला अजुनही तो प्रसंग डोळ्यांसमोर आहे.डिसेंबर २०१३ मध्ये दत्तजयंतीच्या पुर्वरात्रीला १.३० वा आईला छातीत खुप दुखायला लागले व मी आमचे मित्र व राहुरीतील त्याचवेळी नव्यानेच आपल्या मेहनतीने व अचूक निदानक्षमतेने नावारुपाला आलेले डॅाक्टर मंगेश कुंभकर्ण यांना फोन केला व अगदी ५ मिनिटातच ते घरी आले व आईचा ईसीजी व ईतर टेस्ट केल्यावर लगेचच त्यांनी मला बाजुला घेऊन नगरला हलविण्याचा सल्ला दिला व मी आमचे श्रद्धास्थान,अध्यात्मिक गुरु व गुरुवर्य शंकरमहाराजांचे कट्टर उपासक अनगरचे आदरणीय राजाभाऊ कोठारी(विश्वेश्वर महाराज) यांना रात्री २.३० वा फोन केला तर काही बोलण्याच्या आतच ते म्हणाले तू ताबडतोब निघ व नोबल हॅास्पिटलला ये मी पण पोहोचतोच .बरोबर पहाटे ३.२५ वा मी बरोबर हॅास्पिटलच्या दारात गाडीला ब्रेक मारला व दरवाजा उघडून बाहेर उतरत असतानाच राजाभाऊंची गाडी त्यांच मिनिटाला माझ्या मागेच येऊन थांबली .आईला स्ट्रेचरवर क्यज्युअल्टीला घेतले तोच राजाभाऊ तेथील डॅाक्टरवर ओरडले कुठे सह्या करायच्या ते नंतर मी स्वत: करेल पण आधी आईला आयसीयू ला घे. इतका वेळ आपल्याकडे नाहीये.बरोबर ३.३० वा आय सी यु मध्ये डॅा साळुंके कि जे स्वत: अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे आहेत राजाभाऊंना पहाताच उद्गगारले कि दत्तजयंतीच्या ब्रम्हमूहुर्तावर साक्षात दत्तमहाराजांचे मला दर्शन झाले व त्यांनी राजाभाऊंना साष्टांग नमस्कार घातला व लगेचच आईला आत घेतले व राजाभाऊंना आईने पाहिले ,हातात हात घेतला. व त्यांच क्षणाला आई बेशुद्ध झाली ह्दय जवळपास बंदच पडले.राजाभाऊंनी मला,माझ्या दोन बहिणी शुभांगी व सुषमा तसेच माझी पत्नी सोनाली यांना सर्वांना बाहेर काढले .ते स्वत: व डॅा दोघेच आत होते .राजाभाऊंचा कृपाहस्त एक हात आईच्या डोक्यावर होता व एक हात आईच्या हातात होता .व डॅाक्टरांशी सल्लामसलत करुन आईची ट्रिटमेंट चालू होती.दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आईला नॅार्मल करण्यात यश आले .बरोबर ५ वा राजाभाऊ बाहेर आले व म्हणाले आता काळजी करु नका आई आता सेटल झालीये.नंतर त्यांच दिवशी आईची एन्जिओप्लास्टी पार पडली पण भरपुर गोळ्या औषघे चालू झाली होती.आता गेल्या सहा महिन्यांपासुन राहुरीत गव्हाणे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली माधवबाग क्लिनिकमध्ये आईची ट्रिटमेंट चालू केली .प्रथमत: मॅडमनी सर्व तपासण्या करुन आईची शुगर व ईतर पॅरामीटर्स नॅार्मल करण्याकडे अतिशय काळजीपूर्वक व सातत्याने जातीने लक्ष दिले.त्त्याचसोबत आईनेही स्वत: सकारात्मक विचारसरणीसह दररोज सकाळी उठल्यावर गुरुंचे नामस्मरण प्राणायम,योगा,कपालभाती व काही हलके व्यायाम तसेच आहारावर नियंत्रण या सर्व बाबींचे काटेकोर पालन केले.गव्हाणे मॅडमनी पंचकर्म,मसाज व डायट या सर्व गोष्टींवर काम करत असताना शुगर,बी पी हळुहळु कंट्रोलमध्ये आणला .प्रत्येक आठवड्यांचे त्यांनी मॅानिटरींग केले व माधवबागच्या सिनिअर डॅाक्टरांशी वेळोवेळी फोनवर चर्चा करुन शुगर व बीपी च्या गोळ्यांचा डोस हळुहळु कमी कमी करत आणला .वेळोवेळी गरजेच्या लॅबचेस्टही करवून घेतल्या.गेल्या दीड महिन्यांपासुन आईची शुगरची गोळी पूर्णपणे बंद केलेली आहे .आईचे डॅाक्टर नोबल हॅास्पिटलचे डॅाक्टर कांडेकर यांनीदेखील शुगरची गोळी बंद करण्यास परवानगी दिलीआहे ..व मॅडमने आता बी पी ची गोळीही आता ३० % पर्यंत कमी केली आहे.दररोज लागणारी Metpure XR ही गोळी ४ दिवसातून एकदाच केली आहे.काल दि २३.७.२१ रोजी सकाळी शुगरची GTT test (Glucose Tolerance Test) १५ चमचे ग्लुकॅान डी खाऊन दर १ तासाने असे ३ वेळा शुगर चेक केली जाते ती पूर्णत: निगेटिव आलेली आहे.हा खरोखर एक चमत्कारच म्हणावा लागेल.नव्हे तर ही आमचे सदगुरु शंकरमहाराजांनी दिलेला हा गुरुपौर्णिमेचा आशीर्वादच आहे असं म्हटल तर वावगं ठरणार नाही
गव्हाणे मॅडमबद्दल बोलायचे झाले तर कोणतेही कार्य तडीस नेण्याची मॅडमची जिद्द ,संयम,पेशंटसोबत ट्रिटमेंट चालू असताना तयार केलेले जिव्हाळ्याचे संबंध ,सकारात्मक विचारसरणी तसेच विविध टप्प्यांवर पेशंटला येणार्या अडचणी सोडवताना अतिशय अभ्यासपूर्वक व पेशंटला समज़ुन सांगण्याचे कसब खरोखर वाखणण्यासारखे आहे.अनेकदा मला आईसोबत गेल्यावर त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांची पेशंटप्रती असणारी भावना व ठरवलेले ध्येय गाठण्याची जी तळमळ असते ती आजच्या व्यवहारी युगात खुपच कमी ठिकाणी पहायला मिळते.पेशंटला असणारी तक्रारअतिशय शांतपणे मॅडम ऐकुन घेतात व प्रत्येक बारकावा लक्षात घेऊन आस्थेने पेशंटचे समाधान करतात.
मॅडम आपल्या कार्यास त्रिवार वंदन व भावी कारकिर्दीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .आपणास आपल्या कार्यात उत्तुंग यश लाभो व उत्तरोत्तर आपल्या शिरपेचात सन्मान आणि विक्रमाचे नवनवीन तुरे प्रस्थापित होवोत अशी गुरुवर्य शंकरमहाराजांच्या चरणी प्रार्थना🙏🏻

02/07/2021

डायबेटिस बरा होऊ शकतो???
नक्कीच!!!
होऊ शकतो
आमच्या एका रुग्णाचा
अनुभव....
माधवबाग, राहुरी क्लिनिक

डायबेटीस बरा होऊ शकतो....Believe it or not but  my father did this with MADHAVBAUG treatment.Thanks to Dr Ashlesha Gavha...
26/02/2021

डायबेटीस बरा होऊ शकतो....
Believe it or not but my father did this with MADHAVBAUG treatment.
Thanks to Dr Ashlesha Gavhane and look at the transformation.
(Reduction in HBA1Cis the test which shows how diabetes is getting cured)

या संधीचा फायदा घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवा
15/01/2021

या संधीचा फायदा घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवा

01/01/2021

नमस्कार 🙏🏻
आमच्या क्लिनिक मध्ये येऊन उपचार घेणाऱ्या सर्व मंडळीना आमच्या सर्व स्टाफ कडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
मागील वर्षात आपण खूप साऱ्या अडचणींचा सामना केला आहे, जवळचे काही मित्रमंडळी, आप्तेष्ट, ओळखीची काही माणसे सुद्धा गमावलेली आहेत, एवढ्या साऱ्या झंझावातामध्ये सुद्धा आपण धडधाकट असून रोजचा दिनक्रम चालु ठेवून पुढे वाटचाल करत आहोत ह्यासाठी त्या परमात्म्यामाला धन्यवाद देऊन नवीन वर्षाचे स्वागत करूयात!! आणि स्वतःसाठी आणि सर्व विश्वासाठी आरोग्याची कामना करूयात!!
पुन्हा एकदा डॉ. गव्हाणे डेंटल आणि आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक, राहुरी च्या सर्व स्टाफ कडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊😊🙏🏻
आमच्यावरील तुमचे प्रेम असेच कायम राहू देत.
धन्यवाद, लोभ असावा 🙏🏻🌹
*डॉ. महेशकुमार नानासाहेब गव्हाणे.*
*डॉ. सौ. आश्लेषा महेशकुमार गव्हाणे.*
*डॉ.गव्हाणे डेंटल अँड आयुर्वेदिक पंचकर्म सेन्टर,*
*माधवबाग क्लिनिक,*
*करपे इस्टेट, राहुरी.*

Address

Rahuri
413705

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912426235870

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Gavhane Dental and Ayurvedic Panchkarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Gavhane Dental and Ayurvedic Panchkarma Centre:

Share